गुंतवणूकदार, निर्यातदारांसाठी शुक्रवारी (दि.२०) कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- जिल्ह्यातील गुंतवणूकदार, निर्यातदार
व निर्यातक्षम उद्योग घटक यांच्यासाठी महानिर्यात इग्नाईट कव्हेंशन २०२६ चे आयोजन शुक्रवार
दि.२० रोजी आयोजीत करण्यात आली आहे. ही कार्यशाळा बजाज भवन, सी आय एम ए सभगृह, पी-२,
रेल्वे स्टेशन एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर येथे स्काळी ९ ते सायं. ५ यावेळात होणार
आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वय.आर सारणीकर यांनी कळविले आहे.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील प्रमुख
उद्योग क्षेत्राबबत चर्चासत्र, गुंतवणूकीच्य संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रातील
गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, उद्योजकांचे अनुभव इ. बाबींचा समावेश आहे. जिल्हा
उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष, उद्योग संचालनालय,
मुंबई सीडबी बॅंक, जिल्ह्यातील बॅंका, उद्योग संघटना, शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार व जिल्ह्यातील संबंधीत शासकीय
यंत्रणांचे प्रमुख आदी सहभागी होतील. तरी या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु,
मध्यम उद्योग, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, शेतकरी सहकारी उत्पादक
संस्था, प्रक्रिया उत्पादक उद्योग घटक, औद्योगिक संघटना यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन
महाव्यवस्थापक वाय.आर. सारणीकर यांनी केले
आहे.
०००००
Comments
Post a Comment