आहरण संवितरण अधिकाऱ्यांची उद्या(दि.१८) कार्यशाळा; निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणीही सोडवणार
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- महालेखापाल लेखा व हकदारी, नागपूर
व वरिष्ठ कोषागार कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे द्वारा (E-PPO) आणि निवृत्तीवेतन
समाधान या नविन उपक्रमांबाबत माहिती देण्याकरिता सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची
बुधवार दि.१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यशाळा आयोजित
करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये (E-PPO) संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असून
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सकाळी ११ वा. उपस्थित राहावे. तसेच त्याच दिवशी दुपारी अडीच वा. छत्रपती संभाजीनगर कोषागार मार्फत
निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तवेतन धारक यांच्या निवृत्तीवेतन
संबधित अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी PENSION-अदालत महालेखापाल लेखा
व हकदारी, नागपूर व वरिष्ठ कोषागार कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे द्वारा आयोजित
करण्यात येत आहे. निवृत्तीवेतन कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांच्या महालेखापालस्तरावरील असलेल्या
अडीअडचणी परस्पर समन्वयाने सोडविण्यावर विशेषत्वाने भर दिला जाणार आहे. तरी संबंधितानी
अभिलेख्यासह बुधवार दि.१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी
अडीच वा. उपस्थित राहणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
०००००
Comments
Post a Comment