साखर कारखान्यातील वजन काट्यांची पडताळणी पूर्ण; शंका असल्यास तक्रार करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.6(जिमाका)- सन 2025-26
चा साखर गाळप हंगाम सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभुमिवर साखर कारखान्यांमध्ये वापरात
असणाऱ्या सर्व वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन निरीक्षक, वैध मापनशास्त्र विभागामार्फत
करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर वाहन काट्यांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची
स्थापना करण्यात आली असून या पथकांमार्फत नियमित तपासण्या सुरू आहेत,असे छत्रपती संभाजीनगर
विभागाचे सह नियंत्रक वैध मापन शास्त्र सु.ह. चाटे यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांना जर उसाच्या वजनाबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास
त्यांनी आपल्या वाहनाचे वजन साखर कारखान्याबाहेरील अधिकृत वजन काट्यावर करून घ्यावे
व वजनाबाबतची रितसर पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेरील वजन काट्यावरील
वजन आणि साखर कारखाना परिसरातील वाहन काट्यावरील वजनामध्ये तफावत आढळून आल्यास संबंधितांनी
तात्काळ वैध मापनशास्त्र कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.
छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांतील
वैध मापनशास्त्र कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाचे सह नियंत्रक वैध मापनशास्त्र
सु. ह. चाटे यांनी केले आहे.
संपर्कासाठी क्रमांकः-
सह नियंत्रक वैध मापनशास्त्र सु.ह.चाटे,
विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
दुरध्वनी क्रमांक 0240 –
2952656, भ्रमण ध्वनी क्रमांक 9420699011,
उप नियंत्रक वैध मापनशास्त्र शि.ये.
मुंढे छत्रपती संभाजीनगर
दुरध्वनी क्रमांक -
0240-2483818, भ्रमनध्वनी क्रमांक – 8208861270,
उपनियंत्रण वैध मापनशास्त्र छत्रपती
संभाजीनगर शि.ये. मुंढे दुरध्वनी क्रमांक -0240 -2483818, भ्रमण ध्वनी क्रमांक –
8208861270,
उप नियंत्रक वैध मापनशास्त्र बीड
जिल्हा गं.मा. कांबळे दुरध्वनी क्रमांक 02442 – 222417, भ्रमण ध्वनी क्रमांक –
9067146884,
उप नियंत्रक, वैध मापनशास्त्र
र.धो.दराडे (अति कार्यभार) जालना जिल्हा दुरध्वनी क्रमांक - 02482 -220743, भ्रमण ध्वनी
क्रमांक – 9421439999, उप नियंत्रक वैधमापनशास्त्र गं.मा.कांबळे (अति कार्यभार) दुरध्वनी
क्रमांक – 02452 221258, भ्रमण ध्वनी क्रमांक – 9067146884,
उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र नांदेड,
लातूर व धाराशिव आ.आ.कुलकर्णी (अति.कार्यभार) - दुरध्वनी क्रमांक – 02462-233881, भ्रमण
ध्वनी क्रमांक – 9325702569.
००००००
Comments
Post a Comment