कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी

 


छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-२०२६ करिता शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तरी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/ अधिकारी / कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त नितीन पां.पाटणकर यांनी केले आहे.

मतदानासाठीची ही  सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागु राहील. (उदा.खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी ,हॉटेल, खाद्यगृहे,अन्नगृहे,नाट्यगृहे,व्यापार,औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष  सवलत  देण्याबाबत संबंधित आस्थापना  मालकांनी  दक्षता घ्यावी,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदारांकडुन मतदानाकरिता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.अशी तरतुद वर संबंधित शासन परिपत्रकात आहे याची नोंद घ्यावी. तरी मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, हे कामानिमीत्त निवडणूक क्षेत्राबाहेर असल्यास अशा कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना वर नमुद केल्यानुसार मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी देण्यात यावी. असे आवाहन कामगार उप आयुक्त नितीन पां.पाटणकर  यांनी केले आहे.

          यासंदर्भात होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उप आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला असून संबधित कामगार, कामगार संघटनांनी दूरध्वनी क्रमांक 0240-2334603 यावर संपर्क साधावा.

०००००                                         

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा