दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती

 

 


        छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड डिव्हीजन यांचेमार्फत पॉईंटसमॅन या पदासाठी माजी सैनिकांना कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाही वेतन १८ हजार रुपये, महागाई भत्ता, गाडी भत्ता, घर भत्ता ५ हजार रुपये, ड्रेस भत्ता (वार्षिक) व १० दिवस आकस्मिक सुट्टी लागू राहिल. त्यासाठी माजी सैनिकाचे वय दिनांक १३/०१/२०२६ रोजी ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे. किमान शिक्षण १० वी पास किवा आय टी आय प्रमाणपत्र किवा नॅशनल अप्रेंटिस प्रमाणपत्र असावे, शारिरीकदृष्ट्या सुदृढ असावे. इच्छूक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व खालील प्रमाणे माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये शुक्रवार दि.२०  पर्यंत नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेमध्ये ०२४०-२३७०३१३ या क्रमांकावर संपर्क करावा.

०००००

 

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा