बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन

 


         छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- जैन स्वीट कारखान्याच्य पाठीमागे रेल्वे पटरीजवळ दि.७ रोजी अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यास उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्यास मयत घोषीत केले.

सविनय या मयताची ओळख पटलेली नसून त्याचे नातेवाईकही अद्याप मिळून आले नाहीत. तरी खालील वर्णनाच्या बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 वर्णन याप्रमाणे- वय अंदाजे ६५ वर्ष नाव, रंग सावळा, बांधा मध्यम, उंची ५ फुट, चेहरा गोल, डोकीचे केस पांढरे बारीक, डावे बाजुस गालावर काळा मस्सा चे दाग, डावे हाताच्या दंडाच्या पाठीमागे स्कीन निघुन पांढरे चट्टे.

या वर्णनाच्या व्यक्तीबाबत काही माहीती मिळुन आल्यास पोलीस ठाणे वेदांतनगर पो उप निरीक्षक एन व्ही सुपे मोबा नं ९८२२२१०२४१ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा