जि.प.;पं.स.निवडणूकःमतदानाच्या दिवशी (दि.७) आठवडी बाजार बंद
छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार दि.७ रोजी मतदान होणार आहे.
मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी
शनिवार दि.७ रोजी जिल्ह्यात भरवले जाणारे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी जारी केले आहेत. हे बाजार नंतर अन्य दिवशी भरवावे,असेही आदेशात
नमूद केले आहे.
Comments
Post a Comment