जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम; जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप

 






 

        छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका)- शिष्यवृत्ती परीक्षेत गरीब कुटुंबातील मुले केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके नसल्याने मागे पडतात. अशा ३००० विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध करुन दिली आहेत. त्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून  निधी दिला आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते काल (दि.१०) ह्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. जैन इंटरनॅशनल स्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. स्टेट बॅंकेचे क्षेत्रिय प्रबंधक त्रिभुवन, पुस्तकाचे लेखक हर्षवर्षन सूर्यवंशी,  शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे  प्राचार्य राजेंद्र कांबळे, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, क्रांती धसवाडिकर, आर. व्ही. ठाकूर, ए.सी. कापसे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

ग्रामिण भागात शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी अभ्यास व सराव करण्यासाठी ही पुस्तके खास तयार करण्यात आली आहेत. ही पुस्तके वापरुन झाल्यावर पुन्हा जमा करण्यात येतील. पुढल्या वर्षी अन्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना सांगितले की,  केवळ तीन हजार विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात येत आहेत. आणखी मदत मिळाल्यास जास्त पुस्तके उपलब्ध करता येतील. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा सदुपयोग करुन सुव्यवस्थितपणे शाळेला परत करावीत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षक वृंद सतत मार्गदर्शन करीत असतो. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी चांगले यश संपादन करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. याच विद्यार्थ्यांमधून उद्याचे नागरिक घडणार आहेत. त्यामुळे या उपक्रमाचे आगळे वेगळे महत्त्व आहे.

पुस्तकाचे लेखक हर्षवर्धन सूर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जयश्री चव्हाण यांनी तर सूत्रसंचलक आर.व्ही. ठाकूर यांनी केले. गीता तांदळे यांनी आभार मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा