गंगापूर येथे विधी व सेवा महाशिबीर

 






        छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती व गंगापूर तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा शनिवारी (दि.१४) गंगापूर येथे पार पडला.

            मेळाव्याचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी केले.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायालय तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गिरीश अग्रवाल हे होते. जिल्हा न्यायाधीश आर.डी. पाटील, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.बी. बहाळकर, उप विभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे आदी उपस्थित होते.

            धूत कन्या शाळा गंगापूर या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाशिबिरात २०स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यतून विविध शासकीय कार्यालयांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करण्यात आल्या. तसेच विविध सेवा व न्याय सहाय्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश वैशाली फडणीस यांनी कळविले आहे.

०००००

 

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा