महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र वेरूळ येथे महास्वच्छता अभियान
छत्रपती
संभाजीनगर, दि.११(जिमाका)- श्री.क्षेत्र
वेरूळ येथील बारा ज्योति र्लिंगापैकी एक समजल्या जाणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री
निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येतात यासाठी
प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
तथा प्रशासक अंकित यांच्या संकल्पनेतून महास्वच्छता
अभियान राबविण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारेआढावा
घेतला.
13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी
12 या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे यामध्ये वेरूळ येथील एमटीडीसी
पार्किंग ते अरिहंत चौक पर्यंत, अरिहंत चौक ते कमल हॉटेल समोर एसटी महामंडळ भूखंड,
येळगंगा नदी परिसर, येळगंगा नदी ते तलाठी कार्यालय, तलाठी कार्यालय ते तीर्थकुंड, तीर्थकुंड
ते भोसले चौक, भोसले चौक ते अशोक हॉटेल, भोसले चौक ते क्राऊन हॉटेल या परिसराची स्वच्छता
करण्याची जबाबदारी विभागून गटविकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, गंगापूर,
कन्नड तालुक्यांच्या गटविकास अधिकारी यांना दिलेली आहे
यासाठी तालुका खुलताबाद, कन्नड, गंगापूर,
छत्रपती संभाजी नगर येथील 285 ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी कार्यालयातील सर्व
विभाग प्रमुख, कर्मचारी, तहसीलदार कार्यालयातील विभाग प्रमुख कर्मचारी, जिल्हास्तरावरील
विभाग प्रमुख सहभागी होणार आहेत
या महास्वच्छता अभियानात खुलताबाद, कन्नड,
छत्रपती संभाजी नगर, गंगापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हास्तरावरील
विभाग प्रमुख यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार
ढोकणे, उपमुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी पाणी व स्वच्छता डॉ ओम
प्रकाश रामावत, सहाय्यक गट विकास अधिकारी साहेबराव चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत
मंगेश कुंटे, सहायक प्रशासनाधिकारी संजय दारवंटे यांनी केले आहे.


Comments
Post a Comment