महाशिवरात्र यात्रा; वाहतुक मार्गात बदल

 


        छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा असते. भाविकांची गर्दी असते. त्यामुळे महाशिवरात्री कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून दि.१४ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत धुळे सोलापूर महामार्गावरील  वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

करण्यात आलेले बदल याप्रमाणे-

१.       कन्नड,वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहने कन्नड,वेरुळ, कसाबखेड फाटा,वरझडी, माळीवाडा, शरनापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

२.      छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरनापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.

३.      फुलंब्री , सुलतानपुर, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने  फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा