बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; प्रस्ताव मागविले

 

        छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभुत सोई-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून इच्छुक संस्थांकडून अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

अनुदान प्राप्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील इच्छुक बौद्ध संस्थांनी अल्पसंख्याक विकास विभाग यांचे दि.२७ जानेवारीच्या शासन परिपत्रकात  नमूद तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दि.२० फेब्रुवारी पर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. या योजनेंतर्गत पायाभूत सोयी सुविधेसाठी अनुदान  मर्यादा २ लाखावरून वाढवून १० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा