सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका)-सप्ताहभर घेण्यात आलेल्या स्पर्धांमुळे महिला अधिकारी-
कर्मचाऱ्यांमध्ये कलागुण व त्यांच्यातील बहुश्रृतता दिसून आली. नोकरी, प्रपंच करतांना
अशा सांस्कृतिक उपक्रमांमधून सकारात्मकता निर्माण करीत जावे,असे आवाहन जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
मराठी भाषा गौरव दिन (दि.२७ फेब्रुवारी) ते आंतरराष्ट्रीय महिला
दिन (दि.८ मार्च) चे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने महिला गौरव सप्ताह आयोजीत करण्यात आला. यानिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची आज सांस्कृतिक कार्यक्रमांची
समारंभपूर्वक सांगता करण्यात आली. एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात हा सोहळा
पार पडला. यावेळी सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्या महिला अधिकारी कर्मचारी यांना पारितोषिक
वितरणही करण्यात आले.
जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी
(प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, प्राचार्य विद्यानिकेतन
सुनिता राठोड, उपशिक्षणाधिकारी दीपाली थावरे, संगीता सावळे, कल्पना पदकोडे, संगीता
साळुंके, सुनिता वाघ,सुवर्णा देशमुख. सुनिल आदिक सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी
आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित पारितोषिक विजेत्या महिला
अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करतांना सांगितले की, दैनंदिन कामकाजातील ताणतणावांचे
व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम हा एक प्रभावी उपाय आहे.
गीत, संगित, नृत्य, कविता आदी सांस्कृतिक सादरीकरणातून मनावरचा ताण तणाव नाहीसा होतो.
मिळणाऱ्या प्रोत्साहन प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपसुक नकारात्मकता
दुर होते. आयुष्यात आनंद पेरत जावा,असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर यांनी केले.
शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण यांना केंद्रशासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल
त्यांचा सत्कार यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
या सप्ताहात ऑनलाइन निबंध स्पर्धा, चारोळी/घोषवाक्य लेखन, स्लोगन
स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रत्यक्ष स्वरुपात कविसंमेलन, रांगोळी स्पर्धा,फॅन्सी
ड्रेस,रँपवॉक,अन्नपूर्णा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
होते. त्यात २५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला,अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीमती लाठकर
यांनी दिली. आज सप्ताह सांगता समारंभानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरणही
या सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी केले.





Comments
Post a Comment