जिल्हाधिकाऱ्यांच्या बुक बॅंक उपक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाचे योगदान
छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या
संकल्पनेतून जिल्ह्यात बुक बॅंक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज जिल्हामाहिती
कार्यालयाने विविध पुस्तके योगदान म्हणून दिली. सरस्वती भुवन विद्यालयात आयोजीत एका
कार्यक्रमात ही पुस्तके जिल्हाधिकारी स्वामी यांना हस्तांतरीत करण्यात आली.
सरस्वती भुवन विद्यालयात जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लास चालकांची
बैठक बोलावण्यात आली होती. विद्यार्थ्यांना ज्या मानसिक ताणाला सामोरे जावे लागते त्याबाबत
उपाययोजना करण्यासाठी याबैठकीत जिल्हाधिकारी स्वामी, उपसंचालक प्रशांत दैठणकर, जिल्हा
शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, जिल्हा माहिती
अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने,अन्न औषध प्रशासन विभागाचे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अति स्पर्धेच्या काळात मुलांवर अभ्यासाचा
तसेच प्राप्त करावयाच्या गुणांचा , स्पर्धेचा ताण येतो अशा वेळी मुलांना द्यावयाचे
समुपदेशन, त्याबाबत करावयाच्या उपाययोजना यासाठी खाजगी कोचिंग क्लासेसने सुद्धा विद्यार्थ्यांना
काही वेळ द्यावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे माहिती
जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेली पुस्तके बुक बॅंक या उपक्रमात देण्यात आली.
सुमारे ५८ हजार रुपये किमतीची ही पुस्तके असून स्पर्धा परीक्षा, अभ्यासपूर्ण संदर्भ
साहित्य अशा स्वरुपाची ही पुस्तके असून आता ही पुस्तके शिक्षण विभागाला सुपूर्द करण्यात
आली.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हा
माहिती कार्यालयाने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर यांनी
आभार मानले.
०००००



Comments
Post a Comment