यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या
प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तहसिलदार श्रीमती रुपा चित्रक, नायब तहसिलदार
रेवणनाथ ताठे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित
होते.


Comments
Post a Comment