छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ सरपंचांचा सक्रीय सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान
टप्पा -१ अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यास येत्या ७ तारखेपासून सुरुवात होत आहे. शिबीराचा
अंतिम उद्देश हा ग्रामस्थांना सेवा देणे हा असून त्यासाठी सरपंचांचा सक्रीय सहभाग आवश्यक
आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील सरपंचांना केले. यावेळी
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनीही सरपंचांशी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा
-१ जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात
१० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तरावर ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन
करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी
व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी
जनार्दन विधाते यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पापळकर यांनी सरपंचांना या शिबिरांमध्ये सक्रीय
सहभाग देण्याचे आवाहन केले. गावातील एकल महिला वा तत्सम गरजू निराधार व्यक्तिंना विविध
योजनांचा लाभ देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, गावातील
पाणंद रस्ते, प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती, ७/१२ नोंदी दुरुस्ती, महसूली कायद्यांची
जनजागृत व अंमलबजावणी, दाखले वाटप, तुकडे बंदी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूरी
अशा विविध सेवांचे लाभ गोरगरिबांना देण्यात यावे,असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, या शिबिरात आरोग्य
तपासणी, योजनांची जनजागृती अशा बाबींचाही समावेश करावा. अधिकाधिक गरजूंनालाभ मिळावा
यासाठी सरपंचांनी आपले सक्रीय योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील ९ तालुके, ८४ मंडळ, ५०० सजा व १३६९ गावांमध्ये हे
अभियान राबविण्यात येणार असून सर्व मिळून ८४ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिबिरांचे वेळापत्रक या प्रमाणे-
दि.७ मार्च रोजी
भावसिंगपूरा अपर तहसिल, शेकटा ता.
छत्रपती संभाजीनगर, निजलगाव ता. पैठण, वडोदबाजार ता. फुलंब्री, वेरुळ ता. खुलताबाद,
चिंचोली ता. कन्नड, शिवना ता. सिल्लोड, जरंडी ता. सोयगाव, तुर्काबाद ता. गंगापूर, खंडाळा
ता. वैजापूर.
दि.१० मार्च रोजी
आपेगाव ता. पैठण, नाचनवेल ता. कन्नड,
गोळेगाव बु. त. सिल्लोड, शेंदूरवादा ता. गंगापूर, शिऊर ता. वैजापूर.
दि.१४ मार्च रोजी
चौका ता. छत्रपती संभाजीनगर, ढोरकीन
ता. पैठण, पिरबावडा ता. फुलंब्री, चापानेर ता. कन्नड, अजिंठा ता. सिल्लोड, बनोटी ता.सोयगाव, वाळूज ता.
गंगापूर, गारज ता. वैजापूर.
दि.२४ मार्च रोजी
करमाड ता. छत्रपती संभाजीनगर, पिंपळवाडी
ता. पैठण, चिकलठाण ता. कन्नड, पालोद ता. सिल्लोड, आसेगाव ता. गंगापूर, लासूरगाव ता.
वैजापूर.
दि.३० मार्च रोजी
कचनेर ता. छत्रपती संभाजीनगर, नादर
ता. पैठण, उंडणगाव ता. सिल्लोड, डोणगाव ता. गंगापूर, लोणी खु. वैजापूर.
दि.१० एप्रिल रोजी
कांचनवाडी, अपर तहसिल, वरुड काजी
ता. छत्रपती संभाजीनगर, बिडकीन ता. पैठण, आळंद ता. फुलंब्री, बाजारसावंगी ता. खुलताबाद,
पिशोर ता. कन्नड, निल्लोड ता. सिल्लोड, सावळदबारा ता. सोयगाव, हर्सूल ता. गंगापूर,
जानेफळ ता. वैजापूर.
दि.१७ एप्रिल रोजी
पंढरपूर अपर तहसिल, चित्ते पिंपळगाव
ता. छत्रपती संभाजीनगर, बालानगर ता. पैठण, बाबरा ता. फुलंब्री, सुलतानपूर ता.खुलताबाद,
करंजखेडा ता. कन्नड, भराडी ता.सिल्लोड, सिद्धनाथ वडगाव ता. गंगापूर, महालगाव ता. वैजापूर.
दि.२३ एप्रिल रोजी
लोहगाव ता. पैठण, देवगाव रंगारी
ता. कन्नड, आमठाणा ता.सिल्लोड, गाजगाव ता.गंगापूर, बोरसर ता. वैजपुर.
दि.३० एप्रिल रोजी
लाडसावंगी ता. छत्रपती संभाजीनगर,
आडूळ ता. पैठण, हतनूर ता. कन्नड, अंभई ता. सिल्लोड, भेंडाळा ता. गंगापूर, नागमठाण ता.वैजापूर.
दि.५ मे रोजी
पिसादेवी ता. छत्रपती संभाजीनगर, पाचोड ता. पैठण, नागद ता. कन्नड, बोरगाव बाजार ता.
सिल्लोड, जामगाव ता. गंगापूर, बाबतारा ता. वैजापूर.
दि.८ मे रोजी
छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री,
खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, वैजापूर.
दि.१५ मे रोजी उस्मानपुरा अपर तहसिल,
चिकलठाणा ता. छत्रपती संभाजीनगर, विहामांडवा ता. पैठण, मांजरी ता. गंगापूर, घायगाव
ता. वैजापूर.
०००००




Comments
Post a Comment