इमाव, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- राज्यातील इतर मागासवर्ग,
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी असलेल्या शासकीय
वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाल
उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी
https://hmas.mahait.org या शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज मागविण्याबाबत मुदत
वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित झालेले आहेत.
इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दि.१० मार्च पर्यंत अर्ज करावा, दि.११ रोजी पहिली
यादी अंतिम होईल दि.१२ ते २० मार्च कालावधीत
रोजी पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत आहे. शासकीय वसतिगृहासाठी
पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या
विद्यार्थ्यांचे अर्ज पंडीत दीनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले आधार योजनेसाठी
विचारात घेतले जातील. वेळा पत्रकानुसार शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर योजनेसाठी पात्र
असणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर
https://hmas.mahait.org या शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज भरावे असे आवाहन सहायक
संचालक दयानंद कोकरे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment