नौदलातील आजी- माजी सैनिकांचा दि.२४ रोजी मेळावा

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- भारतीय नौदलातील  आजी-माजी सैनिक व त्यांचे अवलंबित यांचा मेळावा मंगळवार दि.२४ रोजी सकाळी ११ वा. आयोजीत करण्यात आला आहे. हा मेळावा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. यामेळाव्यात नौदल मुख्यालय, मुंबई येथून अधिकारी- कर्मचारी उपस्थित राहणार असून आजी व माजी सैनिकांच्या विविध अडचणी, पेन्शन, जन्म तारीख बदल, नावात बदल इ. येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी नौदलात कार्यरत वा सेवानिवृत्त माजी सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी आपल्या अर्जासह, आवश्यक कागदपत्रांच्या दोन प्रतिंसह उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा