घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनी उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






 

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका)- कुंभमेळाच्या पार्श्वभुमिवर वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामे राबवावयाची आहेत. या सर्व विभागांनी आपल्या विभागामार्फत करावयाच्या विकासकामांसंदर्भात उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, पोलीस निरीक्षक डी. आर. फराटे आदी उपस्थित होते.

कुंभमेळ्यानिमित्त प्रत्यक्ष पर्वणी सुरु होण्याच्या आत नियोजीत विकास आराखड्यानुसार कामे सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व संबंधित विभागांनी उपाययोजना राबविण्यास सुरुवात करावी. त्यात मंदिर परिसरातील अतिक्रमणे  काढण्याबाबत ग्रामपंचायतमार्फत उपाययोजना व्हाव्या. त्यासाठी महसूल, पोलीस व पुरातत्व विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात यावी. त्यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांशी स्थानिक प्रशासनाने बोलावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा