मार्च अखेर मतदार यादी पडताळणी आणि मॅपिंगचे काम पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






 

छत्रपती संभाजीनगर, दि,२५:(जिमाका) बीएलओ मार्फत ३० मार्च अखेर मतदार यादी मॅपिंग व पडताळणी मतदार यांच्या घरी भेटी देऊन पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुपारवायझर यांना दिले.                             

जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सुपरवायझर यांची  प्रशिक्षण कार्यशाळा दोन  सत्रात आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणात  उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार  नीलेश अपार उपस्थित होते .                           

मतदार यादीतल नावाची पडताळणी, नवीन मतदाराचा समावेश, स्थलांतर झाले असल्यास नोंद घेऊन मतदाराच्या संमतीने कोणत्याही एका ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. बीएलओ मार्फत होणाऱ्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा सुपरवायझर यांनी घ्यावा,जेणेकरून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील निवडणूक यादीचे मॅपिंगचे काम पूर्ण होईल.   

मतदान केंद्रस्तरीय  निरीक्षक यांना  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्याच्या मतदार यादी पुनरक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे मॅपिंग करण्याचे उद्दिष्ट ९०% पर्यंत दिनांक ३०मार्च अखेर पूर्ण करावे. यासाठी सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे घटक बीएलओ आणि सुपरवायझर यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. तसेच शासकीय सुट्टीच्या दरम्यान देखील  प्राधान्याने मतदार यादीचे मॅपिंग करण्याचे निर्देश स्वामी यांनी दिले.

एक हजार मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रासाठी एक बीएलओ आणि दहा बी एलओ च्या कामकाजासाठी एक सुपरवायझर नेमण्यात आले आहेत. सर्वांनी मॅपिंग करीत असताना मतदाराच्या घरी जाऊन दोन अर्ज देऊन माहिती भरून घ्यावी.ती माहिती एक अर्ज स्वतः कडे घेऊन २००२ सालच्या मतदार यादी सोबत  माहितीची खातरजमा करावी.मॅपिंग करताना२००२ च्या मतदार यादीनुसार मतदाराचे नाव आले का तपासणे. ज्यांचे यादीत नाव नाही ते समावेश करणे,तसेच नवमतदार कोठे होते ते तपासणे आवश्यक आहे.  हे करीत असताना याबाबत मतदाराना विचारणा करण्यात यावी .१८ वयवर्ष असणारे मतदार यांचे पालक,आईवडील यांच्या कुटुंबियातील सदस्याची माहितीच्या आधारे यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे. जिल्ह्यातील मतदारयादी चे मॅपिंगचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश स्वामी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सुपारवायझर यांना दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा