विशेष लेखः- जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरची ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
कोणतीही संस्था असो त्याचे मनुष्यबळ ही त्याची सर्वात मोठी शक्ती असते. प्रशासकीय संस्था त्यातही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या थेट लोकांना सेवा देत असतात, अशा ठिकाणी मनुष्य बळ हे मोठे बलस्थान ठरते. याच मनुष्यबळाच्या सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. १५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमात ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल आज (शनिवार दि.२८) मुंबई येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
काय होता हा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम?
हे या लेखाद्वारे जाणून घेऊ या.
१५० दिवसांचा सेवाकर्मी
प्लस कार्यक्रम
विकसित महाराष्ट्र २०४७ कडे वाटचाल
करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट
साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन
करण्याच्या उद्देशाने १५०दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम देण्यात आला होता. या
कार्यक्रमाचा कालावधी दि.६ मे ते दि.२ ऑक्टोंबर २०२५ असा होता. तथापि, राज्यातील पुरपरिस्थितीमुळे या कार्यक्रमास दि.१० जानेवारी२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
महत्त्वाचे
९ घटक
या
कार्यक्रमात, संबंधित आस्थापनाचा आकृतिबंध, सेवाप्रवेश
नियम, ज्येष्ठता सूची, पदोन्नती स्थिती,
सरळसेवा भरती स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण आणि
कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे अशा ९ घटकांचा समावेश होता.
अशी बजावली कामगिरी
जिल्हा
परिषद प्रशासनाने त्यात उत्कृष्ट काम केल्याचे QCI या
संस्थेने केलेल्या तपासणीत दिसून आले.
जिल्हा परिषदेत गट क व गट ब संवर्गातील १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता सुची
प्रसिद्ध करण्यात आल्या. पदोन्नतीच्या अनुषंगाने गट क व ड मधील १२०५ पैकी ११९७
कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. सरळसेवेने भरावयाच्या मंजूर ११५७८ पैकी १० हजार
३९८ पदे भरण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे बिंदुनामावलीचे प्रमाणीकरणही ४१ संवर्गांचे
करण्यात आले. अनुकंपाद्वारे सर्वच्या सर्व म्हणजे ५२ पदे भरण्यात आली. कार्यरत मनुष्यबळ
हे माहित तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रकुशल असावे यासाठी iGOT या प्रणालीवर प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या गट क व
ड मधील एकूण १११९९ पैकी ११०३८ म्हणजे ९८.५६ टक्के कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली व
११०३५ कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. यात प्रत्येक
कर्मचाऱ्याने किमान ५ प्रशिक्षण पूर्ण करणे
अनिवार्य आहे. कर्मयोगी भारत या अभियानांतर्गत हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. या
शिवाय जिल्हा परिषदेत कार्यरत गट क व ड
च्या एकूण १११९९ कर्मचाऱ्यांपैकी १११५९ कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्यावत करण्यात आली. त्यासाठी
जिल्हा परिषदेने स्वतःचॊ E-HRMS ही प्रणाली विकसीत करुन सेवापुस्तके डिजीटाईज केले आहेत. तालुकास्तरापर्यंत
हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले.
जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत राबविण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रशासन राघवेंद्र घोरपडे यांच्या नेतृत्वात सामान्य प्रशासन विभाग
तालुकास्तरावरील सामान्य प्रशासन विभाग, सर्व विभाग प्रमुख
यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हे शक्य झाले.
प्रशासकीय
सुधारणांमुळे आता प्रशासकीय कामांमध्ये अद्यावतता आली असल्याने त्याचा परिणाम नागरिकांणा
दिल्या जाणाऱ्या सुविधांवर निश्चितच दिसून येईल.
-डॉ.मिलिंद मधुकर
दुसाने
जिल्हा माहिती
अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.
०००००


Comments
Post a Comment