आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री
जनआरोग्य योजना कार्ड व महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्ड हे आरोग्य सेवेचा मोठा आधार
आहे. त्यासाठी हे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी आज दिले.
एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा
ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, जिल्हा सनियंत्रण तथा तक्रार निवारण समितीची बैठक
पार पडली. आरोग्य सहसंचालक डॉ दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कमलाकर मुदखेडकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, ज्येष्ठ
नागरिक महासंघ प्रतिनिधी अनंत आचार्य, जिल्हाधिकारी कार्यालय वैद्यकीय समन्वय कक्ष
प्रमुख डॉ. महेश लड्डा, वरिष्ठ जिल्हा समन्वयक
आयुष्मान भारत योजना डॉ.मिलिंद जोशी, अंमलबजावणी सहाय्य संस्था विभाग प्रमुख डॉ.सुनील
राजपूत, विभागीय दक्षता अधिकारी सुखदेव जाधव, डॉ. प्रगती माने, जिल्हा वैद्यकीय अधिकारी
डॉ. प्रितेश यालकर, आरोग्यमित्र पर्यवेक्षक अकबर शेख आदी समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यात दोन्ही योजना मिळून ३४
लाख ३१ हजार लोकांपर्यंत योजनांचे कार्ड पोहोचवावयाचे आहेत. त्यापैकी आतापर्यंत १०
लाख ८७ हजार जणांना कार्ड देण्यात आले आहेत. हे कार्ड देण्यासाठी आशा स्वयंसेविका,
आपले सेवा केंद्र व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे नोंदणीची सुविधा देण्यात आली
आहे. त्यांच्याकडे या कार्डसाठी लॉग ईन सुविधा देण्यात आली आहे,अशी माहिती देण्यात
आली.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य मित्रांची संख्या,
आयुष्मान कार्ड काढणे, रुग्णालय तक्रार निवारण,
रुग्णालयांचे दावे वेळेवर मिळवून देणे या कामांना प्राधान्य देण्यात यावे,असे
निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
०००००





Comments
Post a Comment