जिल्हा परिषद उपकर निधीतून दिव्यांग लाभार्थी लाभयादी मंजूर
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- जिल्हा परिषद उपकर निधीच्या ५ टक्के निधीतून दिव्यांग
लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत लाभ दिला जातो. त्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी
जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आले आहेत. त्यात दिव्यांगांना विनाअट
घरकुल, स्कूटर, निर्वाह भत्ता या योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. या सर्व पात्र
लाभार्थ्यांची यादी ही संबंधित पंचायत समितीला देण्यात आली आहे. तरी लाभार्थ्यांनी
संबंधित पंचायत समितीशी संपर्क साधून विहित मुदतीत लाभ प्राप्त करावा,असे आवाहन जिल्हा
दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment