जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव आज (दि.२४)पासून; ग्रंथप्रदर्शन, विविध परिसंवाद, काव्यवाचन, गजलयात्राचे आयोजन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचलनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या वतीने मंगळवार दि.२४ व बुधवार दि.२५ असे दोन दिवस जिल्हास्तरीय छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवस वाचकांना व ग्रंथप्रेमींना ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ खरेदीची संधी लाभणार असून विविध परिसंवादांतून वैचारीक मेजवानीही मिळणार आहे. या ग्रंथोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले आहे.

            जिल्हा ग्रंथालय अधिकारी अधिकारी सुभाष साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसीय ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांची माहिती याप्रमाणे-

            मंगळवार दि.२४ रोजी सकाळी ९ वा. ग्रंथ दिंडी क्रांती चौकातून निघेल.महापौर समीर राजुरकर  यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ होईल. वरिष्ठ कोषागार अधिकारी वैजनाथ शेळके, मानव विकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिल सुर्यवंशी, प्रकाशक संघटनेचे कुंडलिक अतकरे, शिक्षण विस्तार अधिकारी जालम चौरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

            सकाळी साडेदहा वा. समता दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय शिरसाट, इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, आ. संजय केणेकर, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ. अब्दुल सत्तार, आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जयस्वाल, आ. श्रीमती अनुराधा चव्हाण, आ. श्रीमती संजना जाधव, आ. विलास भुमरे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ज्येष्ठ साहित्यीक डॉ. दादा गोरे, ग्रंथ निवड समिती सदस्य गुलाबराव मगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार असून  अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर हे राहणार आहेत.

            दुपारी २ वा. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ग्रंथालये या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी डॉ. रा. शं.बालेकर हे राहणार असून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, डॉ. गणेश कुलकर्णी, प्रा. अनिल लहाने हे वक्ते आपले विचार मांडतील. सायं.४ वा. काव्यवाचन होईल. अध्यक्षस्थानी प्रा.ललित अधाने हे राहतील. तर विष्णू सुरासे, हबीब भंडारे, देवानंद पवार, श्रीमती माधुरी चौधरी,सिंधुताई क्षीरसागर, कावेरी खरात, भक्ती शिह्रे, धम्मपाल जाधव  हे कवी सहभागी होतील. सुत्रसंचालन निलेश चव्हाण हे करतील.

            बुधवार दि.२५ रोजी सकाळी ११ वा. ‘अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यः सांस्कृतिक वारसा आणि समाजधारणा’ या विषयावर  परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी ॲड वैशाली डोळस राहतील. प्रा. डॉ. संजय गायकवाड, ॲड. वैशाली कडू, प्रा. महेश खरात हे वक्ते आपले विचार मांडतील. दुपारी २ वा. कथाकथकन कार्यक्रमात नामदेव निकम, संतोष तांबे, निवृत्ती काळे हे सहभागी होतील तर गेनू शिंदे हे अध्यक्षस्थानी राहतील.

            दुपारी साडेतीन वा. गजल यात्रा या कार्यक्रमात रमेश ठोंबरे, गिरीश जोशी, ऋषभ कुलकर्णी, अर्जून गायकवाड, अमेय तांदुळजे हे सहभागी होतील. सायं.साडेचार वा. समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक डॉ. ऋषिकेश कांबळे हे राहतील. जिल्हा शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, सहा. ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील. सम्राटसिंग राजपुत,  साहित्यिक डी.एस. काटे, ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाणी आदी मान्यवर उपस्थित राहतील.

            या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात सहभागाचे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील हुसे, सदस्य जिल्हा शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, प्रकाशक संघटनेचे कुंडलिक अतकरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव सुभाष साबळे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा