माजी सैनिकांसाठी भरती

 


छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)-  मराठा लाईफ इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर यांच्या अधिपत्याखालील माजी सैनिकांसाठी पद भरती केली जाणार आहे. जीडी ॲण्ड क्लर्क, डीएससी या पदांसाठी ही भरती होणार आहे. मराठा लाईन इन्फन्ट्री मध्ये सेवा केलेल्या माजी सैनिकांसाठीच ही भरती होईल. उत्तम चारित्र्य, किमान पाच वर्षे सेवा, शेप १ ही वैद्यकीय वर्गवारी,  जीडी पदासाठी ४६ तर क्लर्क पदासाठी ४८ वर्षे वय असावे. या संधीचा लाभ मराठा लाईन इन्फन्ट्री मध्ये सेवा केलेल्या माजी सैनिकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२४०-२३७०३१३ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा