डाक अदालत सोमवारी (दि.३०)

छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका) -  टपाल विभागातील सेवांबद्दल असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात सोमवार दि.३० रोजी  डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर डाक विभागाच्या सेवांबाबत तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालत मध्ये घेतली जाते. तरी संबंधितांनी आपली डाक सेवेबाबतची तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर-४३१००१ यांच्या नावे दोन प्रतित पाठवावी. नंतर प्राप्त तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा