अनोळखी मयताची माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- भडकल गेट येथे दि.७ रोजी गंभीर
जखमी अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी इसमास घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर
उपचार सुरु असतांना त्यास डॉक्टरांनी दि.८ रोजी मयत घोषीत केले. या प्रकरणी सिटी चौक
पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून अनोळखी मयत व्यक्तीबाबत माहिती
कळविण्याचे आवाहन सिटी चौक पोलिसांनी केले आहे.
मयताचे वर्णन- नाव छायना रमेश (पुर्ण
नाव पत्ता माहीत नाही.), वय अंदाजे ३५ वर्षे,अंगात गुलाबी रंगाचे शर्ट, फीकट काळ्या
रंगाची जिन्स पँन्ट, रंग गोरा, चेहरा गोल, उंची पाच पुट तीन इंच.या वर्णनाच्या व्यक्तिबाबत
काही माहिती मिळाल्यास सिटी चौक पोलिसांत किंवा सहायक फौजदार सुधाकर मिसाळ मो.क्र.
9823101968 यांच्याशीसंपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment