आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड .निलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
छत्रपती संभाजीनगर, दि.12(जिमाका) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.निलेश
हेलोंढे पाटील यांनी खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची
सांत्वनपर भेट घेतली .
शासनाच्या विविध विभागाच्या यात
महसूल ,शिक्षण, आरोग्य. कौशल्य विकास विभागाच्या
योजनांच्या लाभ मिळवून देण्याबाबत त्यांनी
संबंधित यंत्रणेला निर्देशित केले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या
पत्नीला आर्थिक योजनांचा लाभ मिळण्यासाठीचे योग्य ती कार्यवाही करून महिला बालकल्याण
आणि कृषी विभाग तसेच महसूल विभागाला निर्देशित केले.
खुलताबाद
तालुक्यातील
तिसगाव तांडा येथे आत्महत्या केलेले
शेतकरी चांगदेव राठोड , यांच्या घरी भेट दिली व कुटुंबातील सदस्यांना धीर देऊन सांत्वन
केले.कन्नड तालुक्यातील सासेगाव येथे कै. मिट्टूसिंग रुपसिंग सुलाने, यांच्या कुटुंबियातील सदस्याची विचारपूस केली. मुलांच्या
शिक्षणासंदर्भातील आर्थिक मदत व शैक्षणिक मदती संदर्भातही संबंधित विभागाला सूचित केले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश
नाईक.तहसीलदार श्री पांढरे, कन्नड तालुका कृषी अधिकारी,अन्य संबंधित विभागाचे अधिकारी
समवेत होते.
जिल्ह्यात जलतारा प्रकल्प अंमलबजावणी करावी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही तालुक्यात जमिनीतील
पाण्याची पातळी कमी आहे.ती वाढ करण्यासाठी
जलतारा प्रकल्प राबविला जाणार आहे.
यामध्ये कृषी विभाग, जलसंधारण, आणि भूजल सर्वेक्षण, जिल्हा प्रशासन आणि विविध सामाजिक
संस्थांचा सहभाग घेऊन हा प्रकल्प राज्यात राबविला जात आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यामध्येही
राबविण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंढे पाटील यांनी आज दिले. बैठकीसाठी
भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण अधिकारी जीवन बडेवाल, सहायक
जिल्हा जलसंधारण अधिकारी ए .बी शेख हे उपस्थित होते.
00000




Comments
Post a Comment