सैनिकांच्या मुलांच्या वसतीगृहासाठी कंत्राटी पद्धतीने चौकीदार भरती

 


छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत असलेले सैनिकी मुलांचे वसतिगृह,छत्रपती संभाजीनगर येथे कंत्राटी पद्धतीने चौकीदार हे या पदाची भरती होणार आहे. त्यासाठी माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचा तपशील याप्रमाणे- चौकीदार, सैनिकी मुलांचे वसतिगृह, छत्रपती संभाजीनगर, पदसंख्या एक, मासिक मानधन २१ हजार १५९ रुपये, किमान एक वर्षांचा अनुभव.

पात्रता- माजी सैनिक,शारिरीक दृष्ट्या सक्षम,कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

इच्छुक माजी सैनिकांनी सर्व कागद पत्रासह (वैयक्तिक अर्ज,आधार कार्ड,रहिवाशी दाखला,पी.पी.ओ. बँक पासबुक,डिस्चार्ज बुक इ.) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. माजी सैनिकांमधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर नागरिक उमेदवाराकडून भरण्यात येतील.अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवर कॉलोनी, भावसिंगपुरा रोड,छत्रपती संभाजीनगर दूरध्वनी 0240-2370313 वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा