सामाजिक न्याय विभागामार्फत विविध पुरस्कार; इच्छुकांकडून अर्ज मागविले

 


छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्टयपुर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन मिळावे म्हणून समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

            त्या अनुषंगाने सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु - फुले आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार व लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार या पुरस्कारासाठी संबंधित व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांकडून येत्या दि.१५ मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्काराची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जदारांनी  (व्यक्ती व स्वयंसेवी संस्था) दि.१५ पर्यंत आपले अर्ज विहीत नमुन्यात चेक लिस्टसह आवश्यक त्या कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा