सेवा सुधारणांचा १५० दिवसांचा कार्यक्रम; ‘सेवाकर्मी प्लस’ मध्ये जि.प. छत्रपती संभाजीनगर राज्यात अव्वल: मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- राज्य शासनाच्या प्रशासनाला आधुनिक बनवतांनाच प्रशासनाला गति देण्यासाठी सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. १५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमात ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल आज मुंबई येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सेवाविषयक प्रगतीचे मुल्यांकन करणे सेवाविषयक बाबींच्या सुधारणांकरीता १५० दिवसांचा कार्यक्रम दि. मे ते दि. ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. तथापि,राज्यातील पुरपरिस्थितीमुळे या कार्यक्रमास दि.१० जानेवारी२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

काय होते या कार्यक्रमात?

या कार्यक्रमात प्रशासकीय सुधारणांमध्ये मनुष्यबळ विषयक बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यात कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिध्द करणे, पदोन्नती करणे, बिंदुनामावली नोंदवही अद्ययावत करणे,  अनुकंपा भरती, सरळसेवा भरती, केंद्र शासनाच्या iGOT पोर्टलवर नोंदणी तसेच प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे सेवापुस्तिका अद्ययावत करणे या बाबींचा समावेश होता.

जि.प. छत्रपती संभाजीनगरची सर्वोत्कृष्ट कामगिरी

        या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राघवेंद्र घोरपडे यांनी यशस्वी अंमलबजावणी केली. यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गतच्या सर्व खाते प्रमुखांनी त्यांच्या अधिनिस्त सर्व कर्मचाऱ्यांनी सहयोग दिला. त्यामुळे जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या कामकाजाचे शासनस्तरावरुन गुणांकन होऊन राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला.

        या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आज मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा