डिजीटल आर्थिक व्यवहाराबाबत जनजागृती

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व आपले सरकार सेवा केंद्र (CSC e Governance) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल आर्थिक व्यवहारासंदर्भात जनजागृती कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्ह्यातील शुभारंभ मंगळवारी (दि.१७) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.

            डिजिटल आर्थिक व्यवहार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरचे विमोचन जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभाग जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर, जिल्हा समन्वयक आपले सरकार सेवा केंद्र प्रशांत तमखाने, विशाल दिंडोरे,समाधान तुपे, आजिनाथ पवार उपस्थित होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचविण्याचे आवाहन केले. नागरिकांना आर्थिक देवाण घेवाण ही डिजीटल माध्यमाद्वारे सुरक्षित असल्याची माहिती द्यावी,असे निर्देश दिले.

            या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहार, डिजिटल आर्थिक व्यवहाराचे फायदे, ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी तसेच डिजिटल साक्षरता याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियाम प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे,असे शरद दिवेकर यांनी यावेळी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा