लोकशाही दिनी २९ तक्रारी अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत केला जातो. सोमवार दि.२ रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयात लोकशाही दिन आयोजीत करण्यात आला. यावेळी तब्बल २९ तक्रारी अर्ज प्राप्त
झाले. त्याचा विभागनिहाय तपशिल याप्रमाणे- जिल्हा परिषद-२, सार्वजनिक बांधकाम विभाग-१,
कार्यकारी अभियंता मुख्यद्वार उभारणी पथक ४-१, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग
१-१, उपवनसंरक्षक-१, पोलीस विभाग-१, महसूल विभाग-१, पुरवठा विभाग-१ व इतर साधे निवेदन
२० असे एकून २९ अर्ज प्राप्त झाले, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन
विभागाने कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment