जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा बुधवार दि.१८ रोजी

 


 

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने  जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची विशेष सभा बुधवार दि.१८ मार्च २०२६ रोजी जिल्हा नियोजन  समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय , छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत करण्यात आली आहे,असे पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीचा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार दि.१८ रोजी सकाळी १० ते १२ नामनिर्देशन स्वीकारणे, दुपारी २ वा. विशेष सभेस सुरुवात, प्रथम प्राप्त नामनिर्देश पत्राची छाननी त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (मराठी वर्णाक्षर क्रमानुसार) तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रथम अध्यक्षपदासाठी व नंतर उपाध्यक्षपदासाठी एका पेक्षा जास्त उमेदवार असतील तर हात वर करुन मतदान घेण्यात येईल. हात वर करुन मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल, या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती यांना विशेष सभेस हजर राहण्यास कळविण्यात आले आहे. तथापि, सभापतींना मतदान करता येणार नाही. असे पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा