बेवारस वाहनांच्या मुळ मालकांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- सिडको पोलीस स्टेशन येथे ७५ बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली आहे. या वाहनांची निर्गत करावयाची असल्याने मुळ मालकांनी सिडको पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा,असे आवाहन सिडको पोलीस स्टेशनचे निरीक्षक अतुल येरमे यांनी केले आहे. वाहनांची माहिती सिडको पोलीस स्टेशन येथे पहावयास मिळेल,असेही कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment