जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

 



छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात योजनांची माहिती देणारा चित्ररथाचे उद्घाटन आज करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१  ला आज जिल्ह्यात १० ठिकाणी प्रारंभ झाला. याप्रसंगाचे औचित्य साधून देवणी येथील शिबिरात या रथाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे, पंचायत समिती सदस्य पुष्पाबाई साळुंखे, गयाबाई ठोंबरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसिलदार शिवानंद बिडवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने व स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातिल १६८ गावांमध्ये हा चित्ररथ जाऊन नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा