साधना सप्ताहःनोंदणी-प्रशिक्षण कार्यशाळा आज(दि.२)
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- भारत सरकार क्षमता विकास आयोग आणि
कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ ते ८ या दरम्यान ‘साधना सप्ताह’ राबविण्यात
येणार आहे. राज्य शासनातील अधिकारी- कर्मचारी यांना I Got कर्मयोगी या प्लॅटफॉर्मवर किमान ४ तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या
प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आणि या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी व प्रत्यक्ष प्रशिक्षण
करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवार दि.२ रोजी सकाळी १० वा. कार्यशाळा आयोजीत
करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी सभागृह, आमखास मैदानाजवळ, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर
येथे ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेस सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुखांनी
उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. क्षेत्रीय व तालुकास्तरीय
अधिकाऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी ऑनलाईन सहभागाची सुविधाही उपलब्ध करण्यात येईल,असेही
स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment