सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी निःशूल्क प्रशिक्षण दिले जाते. छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि.४ ते १३ मे या कालावधीत प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीनी दि.३ मे  रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे. प्रशिक्षणार्थीना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दि.२ मे रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare,Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB- 65 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन घ्यावे.

पात्रताः-

कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेसाठी अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी परीक्षा उत्तीर्ण व सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी  एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.टेक्निकल ग्रॅज्युएट्साठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.विद्यापीठ प्रवेश प्रणालीस्ठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आय डी : training.pctcnashik@gmail.com  दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हाटसप क्र. 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी ) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा