मयत अनोळखी महिले विषयी माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- रेल्वे स्टेशन पोलीस चौकी शेजारील
पत्र्याच्या शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून
आलेल्या महिलेस घाटी रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर उपचार सुरु असतांना त्यास
डॉक्टरांनी दि १५ एप्रिल रोजी मयत घोषीत केले. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस स्टेशनला
अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून अनोळखी मयत महिलेबाबत माहिती कळविण्याचे आवाहन
वेदांत नगर पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
मयताचे वर्णन- नाव (पुर्ण नाव पत्ता
माहीत नाही.), वय अंदाजे ६० वर्षे, अंगात केशरी रंगाची सलवार त्यावर सोनेरी डिझाईन,
रंग गव्हाळ, चेहरा लांबट गोल, उंची पाच फुट,केस काळे -पांढरे.या वर्णनाच्या महिलेबाबत
काही माहिती मिळाल्यास वेदांत नगर पोलिसांत किंवा सहायक फौजदार एन.व्ही. खराडकर,मो.नं
८८०५०५८२२२ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक, वेदांत नगर पोलीस स्टेशन
यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000
Comments
Post a Comment