बनेवाडी येथील युवक बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर,दि,२०(जिमाका)- बनेवाडी परिसरात आपल्या नातेवाईकांकडे राहणारा २०
वर्षीय युवक घरात कोणास काहीही न सांगता निघून गेला असून याबाबत वेदांतनगर पोलिसां
मिसिंग नोंद करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार पदमा नारायण राजपुत, रा-बनेवाडी,मारोती मंदीराजवळ,छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक १३ एप्रिल रोजी वेदांत नगर पो.स्टे ला खबर
दिली की, त्यांचा भाचा कृष्णा संतोष राजपुत (वय २० वर्ष) धंदा-शिक्षण रा.बनेवाडी हा
दि.११ रोजी दुपारी २ वा. घरात कोणास काही न
सांगता घरातून निघून गेला आहे. त्याचा शोध घेतला तो मिळून आला नाही. बेपत्ता युवकाचे
वर्णन याप्रमाणे- नाव–कृष्णा संतोष राजपुत,शिक्षण -१० वी . रा-बनेवाडी ,उंची-५ फुट
५इंच ,रंग-गोरा,नाक-सरळ,डोळे-काळे,केस-काळे लांब, अंगात ग्रे रंगाचा शर्ट त्यावर पांढऱ्या
रंगाचे टिपके व काळया रंगाची साधी पँट, पायात - सँडल. वरील वर्णनाचा युवक आढळल्यास वेदांतनगर पोलीस स्टेशनला फोन नं-०२४०-२३५१३३३,
येथे हवलदार व्ही.डी. सज्जनवार मोबाईल क्रमांक 9021657005 यावर माहिती द्यावी असे आवाहन
करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment