‘अमृतपेठ - थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाचे आयोजन नागरिकांनी वस्तू खरेदीसाठी भेट द्यावी

 


           

छत्रपती संभाजीनगर, दि२२(जिमाका)-महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ - थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. हे दि.२४ ते २६ एप्रिल दरम्यान शहरातील विघ्नहर्ता गणपती मंदिर हॉल, प्लॉट क्र. २३३-बी, एन-३ सिडको, विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती कॉलेज जवळ येथे भरवण्यात येणार आहे.

स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून, राज्यातील विविध शहरांमध्ये या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अमृतपेठ   या प्रदर्शनात विशेषतः महिला उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले असून, नागरिकांना विविध स्वदेशी व घरगुती उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.प्रदर्शनात विविध खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने तसेच हस्तकलेच्या वस्तूंचा समावेश असणार आहे. स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे माहिती अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, उप व्यवस्थापक योगेश रोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

अधिक माहितीसाठी विभागीय व जिल्हा कार्यालय, अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर  येथे संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा