राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

 


 छत्रपती संभाजीनगर, दि ८ जिमाका- अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत विदयार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी शासनाने मंजूरी दिलेली आहे.सन २०२६-२७ या वर्षातील जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज व त्याची प्रत मागविण्यात येत आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या https://maharashtra.gov.in/site/viewallnews किंवा https://www.maharashtra.gov.in/site/upload/pdf/fs-adv-2026-27.pdf      या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५. मे २०२६ पर्यंत सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आहे . सदरील योजनेचे अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ०३ चर्च पथ, पुणे-०१ यांचे कार्यालयात सादर करण्याबाबतचे आवाहन .

आर.एम. शिंदे ,सहायक आयुक्त, समाज कल्याण, छत्रपती    संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा