पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा रविवारी (दि.२६)
छत्रपती संभाजीनगर,दि,२२(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, छत्रपती संभाजीनगर व अखिल भारतीय श्रीस्वामी
समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२६ रोजी
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जाबिंदा मैदान, बीड बायपास, शहानुरमिया दर्गा
जवळ,छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत करण्यात आला आहे.
यामेळाव्यात पीत्ती इंजिनिअरिंग
लि., परकिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेटलमन ऑटो लि., यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा.लि.,
रूचा इंजिनिअरींग प्रा.लि., मीडास केअर फार्मासिटिकल्स प्रा.लि., रेडिको एन. व्हि.
डिस्टलरिज महाराष्ट्र लिमिटेड, वॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लि.,नहार ग्रुप इंडिया,
निल मेटल प्रोडक्ट्स लि., लिभेर अप्लायन्सेस इंडिया प्रा.लि., , अलंकार इंजिनिअरींग
इक्युपमेंट प्रा.लि., धुत ट्रांन्समीशन लि., अलाईड ब्लँडर ॲड डिस्टीलरीज लि., गरवारे
पॉलीस्टर लि. संजिव ऑटो पार्ट्स मॅन्यूफॅक्चरींग प्रा.लि. कॉस्मो फस्ट लि., न्युटेक
ईलेक्ट्रीकल्स प्रा.लि., नरसीम्हा जॉब ॲड प्लेसमेंट, नेक्सलॅड कंन्सल्टींग एल एल पी,
गरवारे हायटेक कंपनी, रेहेल्को कंपनी, क्वेस क्रॉप लिमिटेड, पुणे, एस एस कंट्रोल प्रा.ली,
बीजी इलेक्ट्रीकल्स इलेक्ट्रॉनिक्स लि., औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी प्रा.लि., एक्सल प्रा.लि.,
रत्नप्रभा मोटर्स अशा विविध २८ आस्थापनांकडून ४९९८ रिक्तपदे प्राप्त झाली असून ते प्रत्यक्ष
उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा,
आय टी आय, एच एस सी, एस एस सी उत्तीर्ण इ. पात्रताधारक युवक युवतींसाठी शैक्षणिक व
व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या
www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी
असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा
बायोडाटाच्या २८ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा
रिक्तपदांसाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक
0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. रविवार दि.२६ रोजी सकाळी साडे नऊ
वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून
रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment