बकवालनगर, वाळूज येथून तरुणी बेपत्ता शोध लागल्यास पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि,२३(जिमाका)- वाळूज परिसरातील युवती आपल्या आत्याकडे
चालले असे सांगुन १४ वर्षीय युवती निघून गेली
असून याबाबत वाळूज पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची
नोंद करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार पांडुरंग नामदेवराव सुर्यवंशी रा.बकवाल नगर
वाळूज, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक १४
एप्रिल रोजी वाळूज पो.स्टे ला तक्रार दिली आहे .यात त्यांची मुलगी रुपाली मारोती पांडव
,राहणार वाळूज ही दि.०७ एप्रिल रोजी सकाळी
६ वाजता घरात वडीलांस आत्याकडे जाते असे सांगून गेली. घरी परत न आल्याने तीचा शोध घेतला असता ती सापडली नाही. बेपत्ता युवतीचे
वर्णन- रुपाली मारोती पांडव, उंची-साडेचार फुट ,रंग-गोरा,नाक-सरळ,डोळे-काळे,केस-काळे
व व्यवस्थित, गुलाबी टॉप व पांढरी पँट असे आहे. या वर्णनाची युवती कोणास आढळल्यास वाळूज पोलीस स्टेशन येथे सदरील
०२४०-२२४०५६० फोन क्रमांक आणि, हवलदार बी.एस.शेळके, मोबाईल क्रमांक ९८८१०२६५९९ यावर
माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाळूज पोलीस स्टेशन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केले आहे.
00000
Comments
Post a Comment