जनगणना संबंधी काम प्राधान्याने पूर्ण करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी. .

 


छत्रपती संभाजीनगर , दि.१० (जिमाका). एक मे पासून जनगणनेचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून प्राथमिक पूर्वतयारी अनुषंगाने असलेले निरीक्षक आणि समन्वयक, प्रगणक यांचे प्रशिक्षण, ऑनलाईन पोर्टल वरील नोंदणीचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी यांनी बैठकीत दिले.  

 

निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे ,जनगणना  जिल्हा समन्वयक पवन  गोडे उपस्थित होते,दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, उपस्थित होते.

 

निवडणुकीच्या कामाप्रमाणे जनगणना कामासाठी सर्व अधिकारी -कर्मचारी आणि जनगणनेच्या कामात नियुक्त असणाऱ्या सर्व यंत्रणांनी प्रथम प्राधान्याने  हे काम पूर्ण करावे. त्या अनुषंगाने असलेले सर्व प्रशिक्षण ,निरीक्षक आणि समन्वयक यांची नोंदणी, त्याचबरोबर करावयाचे कार्यपद्धती ,याविषयीचे काम समजून घेऊन प्रत्यक्ष पोर्टलवर या संदर्भातील माहितीची नोंदणी आवश्यक आहे . कालबद्ध  काम असल्याने प्राधान्याने काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा