महात्मा ज्योतिराव फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली
छत्रपती संभाजीनगर, दि. ११ (जिमाका.) महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त
आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते ,सामान्य प्रशासन विभागाच्या
उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, रोहियो विभागाचे उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे, तहसीलदार
रूपा चित्रक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी महात्मा
फुले यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.
00000


Comments
Post a Comment