विभागीय हातमाग कापड स्पर्धा, पैठणी आणि हिमरु शाल ठरली विजेती

 








 

छत्रपती संभाजीनगर,दि,२२(जिमाका)- प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग विभाग यांच्यावतीन विभागीय हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस योजनेअंतर्गत सन २०२५-२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुजक्कीर आमेर शमीम अहेमद गिराम यांच्या पैठणी साडीस प्रथम क्रमांक, अजिज अहमद गुलाम यांच्या पैठणी साडीस द्वितीय क्रमांक तर इम्रान अहमद कुरेशी यांच्या हिमरु शालीला तृतीय क्रमांक मिळाला. मंगळवारी (दि.२१) रोजी ही स्पर्धा पार पडली.

            विभागीय हातमाग कापड स्पर्धा  देवगिरी नागरी सहकारी बॅंक प्रशिक्षण केंद्र क्रांती चौक येथे पार पडली. हातमागावर आपली वस्त्र कला जोपासणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी ही स्पर्धा भरविली जाते. या स्पर्धेत सादर झालेल्या उत्कृष्ट कला नमुन्यांना पारितोषिक दिले जाते.

            स्पर्धेच्या परीक्षक मंडळात विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, प्रादेशीक उपायुक्त वस्त्रोद्योग वसंत घुले, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक आयुक्त  वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले,विणकर सेवा केंद्राचे योगेश राठोड आदींचा समावेश होता. या परीक्षक मंडळाने दिलेल्या क्रमानुसार मुजक्कीर आमेर शमीम अहेमद गिराम यांच्या पैठणी साडीस प्रथम क्रमांक, अजिज अहमद गुलाम यांच्या पैठणी साडीस द्वितीय क्रमांक तर इम्रान अहमद कुरेशी यांच्या हिमरु शालीला तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये. द्वितीय क्रमांकास २० हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये पारितोषिक दिले जाते.

            या स्पर्धेत एकूण २६ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात हातमागावर बनविलेले विविध वस्त्रप्रावरणे सादर करण्यात आले होते. पैठणी कारागिरांच्या कलेला योग्य ते मूल्य मिळावे व त्यांच्या उत्पादनांना विविध ठिकाणी चालना देण्यासाठी विभागस्तरावर प्रयत्न व्हावे, असे मत डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केले. नामांकीत पैठणी कारागीर कविता ढवळे, वस्त्रोद्योग विभागाचे शेख एजाज, श्रीमती रेणूका कुंजर तसेच अनेक कलावंत व नागरिक उपस्थित होते. प्रशांत सदाफुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा