विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन विणकारांनी सहभाग घेण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर; दि.९ (जिमाका)-महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग विणकरांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि उत्कृष्ट कापड नमुन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'विभागीयस्तरीय हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस योजना २०२५-२६चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विभागीय आयुक्त (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली दि. २१ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे.

या स्पर्धेत निवडल्या जाणाऱ्या सर्वोत्तम कापड नमुन्यांसाठी शासनातर्फे  बक्षिसे दिली जातील यात

 प्रथम बक्षीस,२५, हजार रुपये

 द्वितीय बक्षीस: २०, हजार रुपये,तृतीय बक्षीस: १५ हजार रुपये देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागातील हातमाग विणकर सहकारी संस्था, महामंडळे, तसेच खासगी व इतर क्षेत्रातील विणकर सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी आपल्या हातावर विणलेल्या कापडाचे नमुने १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत 'प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफरगेट, छत्रपती संभाजीनगर' येथे जमा करणे अनिवार्य आहे.

२१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०४:३० वाजता देवगिरी नागरी सहकारी बँक लि. प्रशिक्षण केंद्र क्रांती चौक, भू-विकास बँक इमारत, छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा संपन्न होईल.

विभागातील जास्तीत जास्त विणकरांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या पारंपरिक कलेचे सादरीकरण करावे,असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग तथा विभागीय स्पर्धेचे सदस्य सचिव वसंत घुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा