जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रिसाठी दरपत्रके मागविली
छत्रपती संभाजीनगर,दि.17(जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा माहिती कार्यालयातील जुनी वृत्तपत्रांची रद्दी विक्री
करावयाची आहे.त्यासाठी इच्छुक खरेदीदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे.
त्यासाठी दरपत्रके गुरुवार,दि.23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:00 वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयल,छत्रपती
संभाजीनगर येथे सादर करावीत.वृत्तपत्र रद्दीची पाहणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी
सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत करता येईल.
रद्दी खरेदी करण्यास इच्छुक खरेदीदरांनी जिल्हा माहिती
कार्यालय,दुसरा मजला,ग्रंथालय कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय,छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष
भेट देउन रद्दीची पाहणी करुन दरपत्रक सादर करावे,असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment