सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर: दि.१३  (जिमाका) सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, दि.१५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत वाहतूक नियमावलीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  धुळे-सोलापूर महामार्गावरील *झालटा फाटा ते एस.आर.पी.एफ. (SRPF) कॅम्प* आणि पुन्हा त्याच मार्गे झालटा फाटा पर्यंत (१० कि.मी.) सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज पहाटे ५.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत. झालटा फाटा ते SRPF कॅम्प दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी किंवा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने

बीडकडून छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळेकडे जाणारी वाहतूक  ही हॉटेल पालखी जवळून धुळे येथून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरून ये-जा करण्यासाठी उपलब्ध असेल.

सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांच्या सायकली आणि वाहनांची मोठी वर्दळ असणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ,नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता वाहनधारकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डॉ. विनयकुमार राठोड ,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) छत्रपती संभाजीनगर यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा